मुख्य सामग्रीवर वगळा

संशोधन बिल रद्द करण्यासाठी मुस्लिम सह सर्वपक्षांचा पाटोदा येथे धरणे आंदोलन

*संशोधन बिल रद्द करण्यासाठी मुस्लिम सह सर्वपक्षांचा
 पाटोदा येथे धरणे आंदोलन
*
पाटोदा- :प्रतिनिधी
केंद्र सरकारने नागरी संशोधन बिल आणल्याने सदरील हे बिल अन्यायकारक असून ते रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज पाटोदा येथील मुस्लिम समांजाच्या वतीने तहसील कार्यालय पाटोदा येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे.पाटोदा येथील राजमोहम्मद चौक येथे सर्व मुस्लिम ,हिंदू बाधव एकत्र येऊन  तहसील कार्यलय येथे जाऊन धरणे आंदोलन करण्यात आले.
   दोन दिवसांपूर्वी भाजप सरकारने नागरीकत्व संशोधन बील आणले आहे. या बिलाचा अनेकांनी विरोध केला असून हे बील रद्द करावे, अशी मागणी मुस्लिम समाजासह पेंटर एकबाल,मौलाना अल्ताफ राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवभुषण जाधव,आप्पासाहेब राख,काँग्रेसचे गणेश कवडे सुकाणू समितीचे राजाभाऊ देशमुख, काँम्रेड महादेव नागरगोजे,शेकापाचे विष्णुपंत घोलप, संभाजी बिग्रेड चे महेंद्र मोरे,भयाळा गावचे सरपंच विजयसिंह बागर,अॅड.सय्यद वहाब,अॅड.जब्बार पठाण, उमरबीन चाऊस, शेख वसिम पठाण अक्रमखान, शिवसंग्रामचे सुशिल तांबे,दलीत महासंघाचे दत्ता वाघमारे,यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले आहे. आज पाटोदा येथे नायब तहसीलदार टाक यांच्या कडे निवेदन देण्यात आले आहे.

टिप्पण्या