मुख्य सामग्रीवर वगळा

गडचांदूरच्या रोहिणीची जयपुर येथे होणाऱ्या टेबल टेनिस सामन्यांसाठी निवड

*गडचांदूरच्या रोहिणीची जयपुर येथे होणाऱ्या टेबल टेनिस सामन्यांसाठी निवड
*


गडचांदूर: जयपुर येथे २० ते २२ डिसेंबर दरम्यान 'पश्चिम झोन आंतरविद्यापीठ स्तरीय टेबल टेनिस' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विविध राज्यातील विद्यापीठांचा सहभाग राहणार असून गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व गडचांदूर येथील १९ वर्षीय विद्यार्थीनी रोहिणी लहूजी नवले करणार आहेत. ती सध्या एस.पी.विधि महाविद्यालय चंद्रपुर येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबत टेबल टेनिस या खेळात तिला विशेष आवड आहे. याआधी विद्यापीठा अंतर्गत झालेल्या स्पर्धेत देखील तिने विजय मिळवला होता. आता, जयपुर येथे होणाऱ्या सामन्यात मला विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करायला मिळत असल्याचा आनंद वाटतो. मी माझ्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद व आई-वडील यांना देते असे तिने सांगितले.

मनोज गोरे चंद्रपूर

टिप्पण्या