*टेंभुर्णी येथील साखर कारखान्यावर ढाळेवाडी मधील ऊसतोड मजुरांच्या गाडीला अपघात.
.!*
आज सकाळी ५:३० वाजता टेंभुर्णी जवळच पिंपळनेर येथे असलेल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोडणीचे काम करत असलेल्या पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी गावातील तीन कुटुंबाच्या गाडीला सकाळी फडामध्ये ऊसतोडण्यासाठी जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या वाळूच्या टिपरने त्यांच्या तीन बैलगाड्याला उडवले आहे.यामध्ये दोन बैलांचा मृत्यू व ढाळेेवाडी गावातील पाच मजुर गंभीर जखमी झाले आहेत.
यामध्ये ढाळेेवाडीचे ऊसतोड मजूर लक्ष्मण अंकुश जगदाळे,(४०) अर्चना लक्ष्मण जगदाळे,(३८) बाळू अश्रूबा वाळेकर,(४१)कांताबाई बाळू(३८) वाळेेकर,योगेश बाळू वाळेकर(१६) हे जखमींची नावे आहेत,त्याचबरोबर लक्ष्मण जगदाळे यांचा एका बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे व आणखी तीन बैल अत्यंत गंभीर आहेत, ही सर्व परिस्थिती होत असताना टिपरचा ड्रायव्हर पळ काढण्याच्या तयारीत होता,परंतु गावकऱ्यांच्या सावधगिरीमुळे त्याला जाऊ दिले नाही.
हा सर्व प्रकार घडता क्षणी मुकादम अर्जुन (बरकू)सकुंडे, मजुर बळीराम हुले,देविदास वाळेकर,शिवाजी सकुंडे यांनी कारखान्याशी संपर्क करून शेतकी अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी अपघाताच्या जागेवर हजार झाले व अपघाती मजुरांना लगेच टेंभुर्णी येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यामध्ये एक महिला जास्त गंभीर व हाड फ्रॅक्चर असल्याने सोलापूर येथे हलवण्यात आले आहे. व सदरील अपघाताचे १० वाजता स्पॉट बैलांचे पंचनामे झाले आहेत.अशी माहिती मुकादम सकुंडे यांनी दिली आहे.
सदरील सर्व अघटित प्रकार पाहिल्यादा गावातील मजुरांसोबत घडल्याने गावांमध्येे हळहळीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पण्या