मुख्य सामग्रीवर वगळा

सामाजिक कार्यकर्ते नय्युम पठाण यांनी केला बेवारसाचा अंत्यविधी

सामाजिक कार्यकर्ते नय्युम पठाण यांनी केला बेवारसाचा अंत्यविधी
 प्रतिनिधी । पाटोदा  दि २०- ज्यांना कोणीच नसते त्यांच्या साठी पाटोदा शहरात सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपनगराध्यक्ष नय्युण पठाण हे आसतात. असाच बेवारसाचा अंत्यविधी नय्युम पठाण यांनी दि १९रोजी केला.
    पाटोदा येथे अनेक वर्षांपासून बेवारस चव्हाण मामा व त्यांची पत्नी पाटोदा  शहरात पोट भरण्यासाठी आले. ते पाटोदा शहरातील हॉटेलमध्ये पाणी टाकून पोट भरत होते. पाटोदा शहरात त्यांना मामा म्हणून ओळखले जात होते.  त्यांचे दु:खद निधन झाले .  लोकांच्या हाॅटेलात पाणी भरून आपली उपजीविका भागवणारे मामा यांचे निधनाची वार्ता कळताच पाटोदा येथिल नय्युम पठाण, माजी सरपंच किशोर अडागळे, अरविंद सरोदे, थोरात मामा, सय्यद शफ्फु, शेख असेफ , जितेंद्र भोसले, कलीम शेठ,सखाराम तुपे,जावेद मकराणी बाळासाहेब जावळे यांनी मदतीला धावुन संतती नसलेल्या चव्हाण मामा यांच्या अंत्यविधी ची  तयारी  केली. सरपन, अंत्यविधी चे  साहित्य हे सर्व जमा करण्यात आले होते. तीन वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे  निधन झाल्यानंतर चव्हाण मामा मस्जिद, मंदीर समोर भिक्षा मागुन आपली उपजीविका भागवत होते त्यांचे निधन झाले त्यांना कोणी वारस नसल्यामुळे माजी उपानगरध्यक्ष नय्युम पठाण  यांनी पुढाकार घेऊन शोकाकुल वातावरणात पोलीसांनच्या सहकार्याने अत्यंविधी करण्यात आला आहे. या अगोदर नय्युम पठाण मुस्लिम असुन सुध्दा अनेक बेवारसांचे अत्यंविधी केले आहे.यामुळे पाटोदा व परिसरात बेवारसांचा वारसदार नय्युम पठाण आहे असे पाटोद्यात बोलले जातात . या अंत्यविधीस पाटोदा शहरातील हॉटेल चालक, पोलिस, व ईतर ग्रामस्थ हजर होते. लोकांना पाणी पाजण्याचे पुण्य फळाला आले.शेवटी अंत्यविधीसाठी मुलाची उणीव पाटोदाकरांनी भासु दिली नाही.

टिप्पण्या