मुख्य सामग्रीवर वगळा

शासनाच्या उदासीन धोरणामुळे लाभार्थी अमृत आहार योजनेपासून वंचित

शासनाच्या उदासीन धोरणामुळे लाभार्थी अमृत आहार योजनेपासून वंचित

अंडी , केळी , बिस्किट वाटप करुन केले अभिनव आंदोलन

लाभार्थ्यांसह ठिय्या आंदोलनाचा इशारा


कोरपणा तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या नांदा ग्रामपंचायतींमधील राजुरगुडा व लालगुडा येथील अांगनवाड्या अधिकार्‍यांनी अमृत आहार योजनेपासून वंचित ठेवल्या मागणी केल्यावरही शासन अधिकार्‍यांचे उदासीन धोरण असल्याने आज अंगणवाडी केंद्रात लाभार्थ्यांना अंडी , केळी व बिस्किट वाटप करून अभिनव आंदोलन करून निषेध व्यक्त करीत तात्काळ अमृत आहार योजनेचा लाभ देण्याची मागणी केली असून याकडे दुर्लक्ष केल्यास लाभार्थ्यांसह कोरपना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला अाहे


नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य अभय मुनोत यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी कोरपना यांचेकडे राजुरगुडा व लालगुडा येथील अंगणवाडी केंद्रे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आहार योजनेत समाविष्ट करावी अशी मागणी सहा महिन्यापुर्वी केली होती यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहेत बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या दुर्लक्षतेमुळेच या ठिकाणच्या लाभार्थ्यांना अमृत आहार योजनेपासून मागील पाच वर्षांपासून लाभ मिळाला नाही तरी सुद्धा सातत्याने मागणीनंतर शासन स्तरावरील अधिकार्‍यांचे उदासीन धोरण दिसत असल्याने ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच घागरु कोटनाके , ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत ,  अमावस्या तोडासे , शारदा मंडाळी , हारुण सिद्दिकी , महेश राऊत , सोनु बेग , गणेश लोन्ढे , मंगल तोडासे यांनी आज दिनांक १६/१२/२०१९ रोजी या ठिकाणच्या अंगणवाडी केंद्रांमध्ये सर्व लाभार्थ्यांना केळी अंडी व बिस्किटचे वाटप करून अभिनव आंदोलन करीत निषेध नोंदवून येत्या ७ दिवसात या अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना अमृत आहार योजनेचा लाभ द्यावा अन्यथा येथील लाभार्थ्यांसह बालविकास प्रकल्प अधिकारी कोरपना यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा  देण्यात आला असल्याने शासन अधिकार्‍यांनी दक्षता घेऊन तातडीने दखल घेऊन खऱ्या आदिवासींना अमृत आहार योजनेचा लाभ देण्याची गरज आहे

अमृत आहार योजनेचा फज्जा

कोरपना तालुक्यात अमृत आहार योजनेची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत नसल्याची खात्रीलायक माहिती आहे अधिकारी वर्ग उदासीन असल्याने तालुक्यात अमृत आहार योजनेचा फज्जा उडाला आहे यासाठी गावोगावी जाऊन लाभार्थ्यांमध्ये जागृती करणार आहे आम्हाला आज अभिनव आंदोलन करून उदासीन अधिकाऱ्यांचा निषेध करावा लागला राजुरगडा व लालगुडा येथील अंगणवाडी केंद्र तात्काळ अमृत आहार योजनेत समाविष्ट करावे अन्यथा आम्ही लाभार्थ्यांसह ठिय्या आंदोलन करुन न्याय मागणार आहे

              अभय मुणोत
      सदस्य ग्रामपंचायत , नांदा

टिप्पण्या