मुख्य सामग्रीवर वगळा

कर्जमाफी होईपर्यंत बॅंकेच्या वसुलीला स्थगिती द्या :गणेश कवडे

*कर्जमाफी होईपर्यंत बॅंकेच्या वसुलीला स्थगिती द्या मुदती कर्जे थकीत गेल्याने मंजूर पिक कर्ज अडवली **  *गणेश कवडे
** सर्व तालुक्यातील शेतकऱ्याचा सातबारा उतारा कोरा करायला काही कालावधी लागणार असेल तर सध्या विविध बॅंकांकडून सुरू असलेली शेती ची वसुली थांबली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी केली आहे मधल्या काळातील विविध संकटामुळे शेतकऱ्याकडे मध्यम मुदतीची कर्जे थकीत गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मंजूर पिक कर्ज ही बँकांनी अडवून ठेवले आहेत अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत निवडणुकीकाहीतरी सत्तेत आलेल्या तिने पक्षाने राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले आहे त्या दृष्टीने सध्या शासन स्तरावर शेतकरी कर्जमाफी च्या जोरदार हालचाली सुरू आहेत मात्र राज्यातील शेतकऱ्यावर किती कर्ज आहे त्याचे चित्र स्पष्ट होण्यास काही कालावधी जाणार आहे पिक कर्ज किती लघू आणि मध्यम मदतीची शेती कर्ज किती आहे शेतकऱ्यांची संख्या तसेच त्यांच्याकडील धारण क्षेत्र किती याकडे पुढे येण्यास काही अवधी लागणार आहे शासनाच्या विविध विभागाकडून यासंदर्भातील सविस्तर अहवाल मागवले गेले आहेत त्यानंतर एकंदर आकडेवाडी पाहून कर्जमाफीसाठी किती आर्थिक तरतूद करावी लागेल ती कशी उभी करायची याची तरतूद केल्यानंतर कर्जमाफी कशा रीतीने करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे म्हणजेच सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ करायचे किती अस हेक्टरी ची मर्यादा घालायची अथवा किती  पर्यंत कर्जमाफी द्यायची याचाही निर्णय घेतला जाणार आहे या सगळ्या प्रक्रियेला आणि त्यानंतर अंमलबजावणीसाठी ही मोठा कालावधी लागणार आहे त्यामुळे संकटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पण प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागलेला असेल सध्या बँका शेतकऱ्याकडून आधीच्या थकबाकीच्या वसुलीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत त्यासाठी बँका वकिलामार्फत शेतकऱ्यास नोटिसा पाठवत आहेत यामुळे शेतकरी चिंतेत आहे एकीकडे राज्यातील नव्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मागे बँकाच्या वसुली चा तगादा सुरूच आहे गेली तीन ते चार वर्षे राज्यातील शेती विविध संकटात सापडली आ त नाही त्यातच शेतकऱ्याची मुदत कर्ज ही थकीत आहेत पीक कर्जाशिवाय शेतीच्या इतर कर्जासाठी शेतकरी मदत कर्जावर अवलंबून असतात बँका विकास सोसायट्या चा त्यांचा वर्षाचा हप्ता ठरवून देतात मात्र ही मुदत कर्जे थकीत असल्याने शेतकऱ्यांना इतर कर्जे दिली जात नाहीत विशेषता पीक कर्ज मंजूर असलेले तरी ते दिले जात नाही बँक पीक कर्ज काढून ठेवत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत त्यामुळे राज्य शासनाकडून कर्जमाफीचा निर्णय जाहीर होईपर्यंत बँकाकडून सुरू असलेल्या कर्ज वसुलीला स्थगिती दिली जावी अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी केली शेतकऱ्यांच्या खात्यावर होल्ड मारण्याचे काम सध्या बँक करत आहे ते तात्काळ बंद करावा व कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांची कर्जे वसूल करण्याचा घाट बँकेने बाजूला ठेवावा नसता बँकेच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने आंदोलन उभा केले जाईल असे काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी सांगितले

टिप्पण्या