मुख्य सामग्रीवर वगळा

वाघाने घेतला एक बळी;दीड महिन्यातली चौथी घटना दोघंचा मृत्यू

मंगेश कोडापे वाघाने घेतला बळी एक दीड महिन्यातली चौथी घटना दोघंचा मृत्यू
  .आणी. दोघ गंभीर जखमी राजुरा तालुक्यात जंगल परिसरात ही घटन
जंगलात काड्या गोळा करण्यास गेला असता इंदिरा नगर निवासी मंगेश कोडापे हा आज सकाळी राजुरा परिसरानजीक असलेल्या जोगापूर जंगलाच्या हद्दीत वाघाचा बळी ठरला असुन वन विभागाने वारंवार दिलेल्या सुचना कडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांना आपला जिव गमवावा लागत आहे.
मंगेश कोडापे काही इतर लोकांसह सकाळी जंगलात गेला होता मात्र काही वेळातच वाघाने त्याच्यावर झडप घातली आणि काही कळायच्या आत त्याच्या नरडीचा घोट घेतला. आणि त्याचा मृतदेह दूरवर फरफटत नेऊन झुडपात लपवून ठेवला. सोबत असलेले इतर लोक घटना घडताच पसार झाले आणि त्यांनी इंदिरा नगर परिसरात येऊन लोकांना घटनेची माहिती दिली.
घटना कळताच प्रस्तुत प्रतिनिधीने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली परंतु नेमके ठिकाण सांगायला कुणीही तयार नसल्याने प्रस्तुत प्रतिनिधीस जंगलात बरीच पायपीट करावी लागली. शेवटी घटनास्थळ शोधुन काढण्यात यश आले.
वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटना कळताच घटनास्थळी पोहचले असुन त्यांनी पंचनामा सुरू केला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने पंचनामा सुरू असताना घेतलेला व्हिडिओ सोबत दिला आहे.
आजच संपलेल्या जोगापूर  यात्रेपाठोपाठ ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.अत्यंत गरिब परिस्थितीतील मंगेशचे ह्यामुळे उघड्यावर पडले असुन वन विभागाने तत्काळ मदत द्यावी अशी मागणी होत आहे.


मनोज गोरे  जिल्हा चंद्रपुर

टिप्पण्या