मुख्य सामग्रीवर वगळा

नसता तालुकाबंद करु-नगरसेवक राजू जाधव

*महाविकास आघाडी सरकारचा विमा कंपनी वरधाक नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा योजने पासून वंचित राहु लागला यावर तात्काळ पर्याय काडा नसता तालुकाबंद करु-नगरसेवक राजू जाधव*
पाटोदा *(प्रतिनिधी )* महाविकास आघाडी सरकारचा विमा कंपनी वर धाक नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा योजना पासून वंचित राहुलागला तसेच बीडसह इतर 9 जिल्ह्यात शेतकरी पीकविमा योजनेच्या निविदा कोणत्याही विमा कम्पनीने न भरल्यामुळे येथील शेतकरी रब्बी हंगामातील पिकविम्यापासून वंचित राहू शकतात, त्यामुळे सदर कंपन्यांना निर्देशित करून शेतकऱ्यांचे पिकविमे तात्काळ भरून घ्यावेत व शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा तसेच सततच्या दुष्काळाने सतावलेल्या शेतकऱ्याला पीकविमा थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळवून देतो २०१९-२० च्या रब्बी हंगामात मात्र बीडसह लातूर, हिंगोली, वाशीम, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा , सोलापूर आदी जिल्ह्यात कोणत्याही विमा कम्पनीने विविध कारणे देत पिकविम्याच्या निविदा न भरल्याने येथील शेतकऱ्याला पिकविम्यापासून वंचित राहावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील पीकविमा हफ्ता भरण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे बीडसह अन्य उपेक्षित जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात असून विमा प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अगोदर कोरड्या आणि आता शेवटी ओला दुष्काळाचा सामना करावा लागल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असून  पिकविम्यासारख्या योजनेतून त्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळत असतो, त्यापासून ही शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून याबाबत सरकारने तात्काळ निर्णय घेऊन कारवाई करावी नसता आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा तालुका बंद करु असा इशारा पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक राजू  जाधव यांनी दिला आहे

टिप्पण्या