मुख्य सामग्रीवर वगळा

गंगाखेड मतदार संघात मोहन घनदाट यांचा जनसंवाद दौरा

गंगाखेड मतदार संघात मोहन घनदाट यांचा जनसंवाद दौरा
-----------------------///------------------------
गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड,पालम,पूर्णा शहरासह गाव वाड्या तांड्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांचे जेष्ठ चिरंजीव मोहन घनदाट यांनी दिनांक 29 डिसेंबर पासून सुरुवात केली या संवाद दौर्‍या च्या पहिल्या दिवशी दिनांक 30 डिसेंबर रोजी पूर्णा शहरासह तालुक्‍यातील पेनुर, सुहागण, बरबडी, ताडकळस ,चुडावा खोरस,धानोराकाळे ,देऊळगाव वझुर ,कावलगाव ,आदी गावांना भेटी देऊन जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत यापुढेही जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मनोगत व्यक्त केले यानंतर दिनांक 31 डिसेंबर रोजी पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव ,पेठ शिवणी, केरवाडी, बनवस, उक्कडगाव आदी गावांना भेटी देत प्रमुख कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी जनतेशी संवाद साधला यानंतर दिनांक 1 जानेवारी रोजी गंगाखेड तालुक्यातील सावरगाव या गावातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी गावातील कापड दुकान व स्वीट मार्ट या दुकानांचे उद्घाटन प्रसंगी भेटी देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यकर्त्यांना व जनतेने बोलताना म्हणाले की माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांच्या आशीर्वादाने यापुढेही गंगाखेड मतदार संघातील कोणत्याही कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडणार नाही कार्यकर्त्यांच्या खंबीर पाठीशी उभे राहून त्यांना स्टॅन्ड करण्याचे काम घनदाट परिवार करणार असल्याचे स्पष्ट केले यापुढे मित्रमंडळाचा नेता म्हणून भरत घनदाट हे असतील असे घोषित केले यावेळी त्यांच्या समवेत जयसिंग आप्पा शिंदे, रामकिशन दुधाटे ,गोपीनाथ तुडमे, दत्तराव भोसले, सदाशिव आप्पा ढेले, राजू नारायणकर, ब्रह्मानंद भोसले ,व्यंकटराव पारवे, डिके पाटील आप्पासाहेब ेशमुख, रमेश पोळ ,भागवत मुरकुटे ,अर्जुन जायभाय, मधुसूदन लटपटे ,रावसाहेब शिंदे, शिवाजीराव शेरकर, दयानंद कदम ,सभापती चापके रमेश महामने, गोविंद जाधव, माधव राठोड ,शिवराज स्वामी ,किशन वळसंगीकर, कल्याण जाधव, उत्तम जाधव, पंढरी राठोड, आदी कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या