मुख्य सामग्रीवर वगळा

वाघाची शिकार करणारी टोळीचा पर्दाफास



*एक मोठी बातमी:-*

*वाघाची शिकार करणारी टोळीचा पर्दाफास*

*(आठ आरोपींना अटक, शिकारी केलेल्या वाघाचे अवशेष हस्तगत)*

*चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे*

ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र भुज, नियतक्षेत्र मुडझा
मधील कक्ष क्र. 1179(pf) मध्ये वाघांची शिकार केल्याची घटना उघडकीस आली.असून त्यात वाघाची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफास करून आरोपींना गजाआड करण्यात आले.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, दिनांक 11/01/2020 रोजी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास वाघ मृतावस्थेत असल्याचे काही गावातील महिलांना निदर्शनास आले असता वनविभागास माहिती दिली.तेव्हा गावातील महिलांनी दिलेल्या माहितीनुसार मुडझा नियतक्षेत्रात कक्ष क्र.1179(pf) येथे वाघ याचे शव सकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान या वनविभागास प्राप्त झाले. माहिती प्राप्त होताच वनाधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी, AIG NTCA श्री. हेमंत कामडी आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी श्री. विवेक करंबेकर, मानद वन्यजीव रक्षक, ब्रम्हपुरी
हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.तेव्हा प्राथमिक निरिक्षणानुसार घटनास्थळी असे निदर्शनास आले की सदर मृत वाघाचे डोके आणि चारही पंजे,शेपटी,धडापासुन वेगळे करुन दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याचे दिसुन आले असता घटनास्थळी एका गायीचे मृत शव प्राप्त झाले त्यामुळे वनविभागाला आणखी तर्क वितर्क शंका कुशंका मनात निर्माण होऊ लागल्या की वाघाची शिकारच झाल्याचे दिसून येत आहे.आणि घटनेचा कसून तपास सुरू केला.
तेव्हा गायमालक श्री.बाजीराव नारायण मशाखेत्री रा.मुडझा व श्री. राकेश लक्ष्मण झाडे गुराखी रा.मुडझा यांना ताब्यात घेतले व त्यांची विचारपूस केली.चौकशी अंतर्गत गायमलक यांनी वनविभागाला माहिती दिली की वाघाबद्धल गुराखी राकेश झाडे यांना सर्व प्रकार माहिती असल्याचे सांगितले. तेव्हा गुराखी यांनी कबूल केले व बाकीचे अवशेष हे यशवंत बोबाट रा.मुडझा यांच्याकडे आहे.लगेच यशवंत बोबाटेला अटक करून वनविभागाने त्याची कसून चौकशी केली असता पोपटासारखे बोलू लागला की वाघाचे अवशेष शेताला लागून असलेल्या नाल्यात जाळले व बाकी अवशेष
नारायण नागापुरे,दादाजी नवघडे, बंडू पाल,चक्रदास हुलके,यशवंत चिमुरकर,महिंद्र उर्फ बंटी गावतुरे यांचे कडे आहे.तेव्हा वनविभागाने तात्काळ बाकीचे सहाही जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.वाघाची शिकार करणाऱ्या आठ आरोपी कडून वाघाचे डोके तुटलेल्या अवस्थेत, एक कुऱ्हाड दांड्यासहित,तीन पंजे व शेपूट जळलेल्या अवस्थेत, वाघाचा एक पंजा पाच नखासहित व वाघाची आठ नखे जप्ती करण्यात आले.
अशाप्रकारे वाघाची शिकर करणाऱ्या आठ जणांच्या टोळीचा पर्दाफास करण्यात वनविभागाला  यश आले.

टिप्पण्या