मुख्य सामग्रीवर वगळा

हिरकणीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी अलोट गर्दी. ...! सैराट फेम प्रदिप यांच्या कडुन विद्यार्थ्यांचे कौतुक ..

हिरकणीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी अलोट गर्दी. ...! सैराट फेम प्रदिप यांच्या कडुन विद्यार्थ्यांचे कौतुक ..




 हिरकणी सीबीएसई स्कूल चोरवड येथे बाल ऊर्जा महोत्सव रविवारी (ता. 9)रोजी थाटात संपन्न झाला. यावेळी शाळेत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर ,हिंदी, मराठी लोकगीते , शेतकरी आत्महत्येवर आधारित व छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत देखावा व चित्तथरारक कवायतीचे सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.हिरकणीच्या बालकला महोत्सवाचे उद्घाटन खासदार बंडू ऊर्फ  संजय जाधव व सैराट चित्रपटातील सिनेअभिनेते प्रदिप गळगुंडे ऊर्फ लंगड्या यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव देवकते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार बंडू जाधव,
भास्कर काळे, संजय रायबोले,संतोष डोणे,प्रा.माऊली मुंडे ,संदीप कांबळे, नागोराव लवटे, संस्थापक सचिव अशोकराव लवटे आदी  मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांकडून लोकगीत, देशभक्तीपर, समाजप्रबोधनपर गीते सादर करून एक वेगळाच संदेश देण्याचे काम चिमुकल्यांनी केल्यामुळे मान्यवरांकडुन शाळेचे संचालक लवटे यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष चलोदे,शेख अहमद,धीरज जावीर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक लवटे,गोपाळराव देवकते, शेख अहमद, धिरज जावीर,संतोष चलोदे,वर्षा दुबे,उमेश काळे,नारायण गांजले,रवी कलऊल्ला,, रंजीत सिंग, प्रा.नितेश तांबे,रहीम शेख, राम सोळंके,अब्दुल शेख,माऊली लवटे,मोक्षदा मानवतकर,युनुस शेख,नामदेव वाघमारे, उमेश काळे, दत्ता पौळ, जयश्री लवटे,स्वामी प्रणिता यांच्या सहकार्याने कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

टिप्पण्या