राणीसावरगावकरांकडून कलागुणांना दाद देत केले विद्यार्थ्यांचे कौतुक (व्हिडीओ जर्नालिस्ट नामदेव गुंडेवाड)
गावकऱ्यांकडून कलागुणांना दाद देत विद्यार्थ्यांचे कौतुक..
---------------^^^^---------------
राणीसवरगाव (प्रतिनिधी) श्री संगमेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था राणीसावरगाव द्वारा संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कूल व उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज बाल कला महोत्सव 2020 तीर्थ कल्लोल परिसरात सोमवार ( दि.9) रोजी थाटात संपन्न झाला.यावेळी शाळेत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर ,हिंदी, मराठी लोकगीते , शेतकरी आत्महत्येवर आधारित व छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत देखावा व चित्तथरारक कवायतीचे सादरीकरण करून उपस्थित राणीसावरगावकरांना मंत्रमुग्ध केले.
छत्रपती शिवाजी महाराज बालकला महोत्सवाचे उद्घाटन मराठी व हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री साक्षी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुरेश गंगाधरराव चव्हाण (सरपंच राणीसावरगाव) तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुधीर पाटील साहेब (उप विभागीय अधिकारी गंगाखेड) श्री नीलपत्रेवार साहेब (गटशिक्षणाधिकारी गंगाखेड) श्रीनिवास मुंडे (जि.प सदस्य परभणी) दत्तराव जाधव,मधुकर जाधव, नारायण जाधव ,मारुती आप्पा कोरे, बाळासाहेब भिमानपल्लेवार ,तुकाराम हाके, डॉ.परसराम शिंदे ,दीपक नांदुरे, पत्रकार उद्धव चाटे, रमेश महामुने, नारायण कदम,"लागीर झालं जी"मधील फौजी यशवंत ढेकळे,सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी रितिका तोरणे व बाल कलाकार जादू पतंगे, सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत मुंडे, रुद्र मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांकडून लोकगीत, देशभक्तीपर, समाजप्रबोधनपर गीते सादर करून एक वेगळाच संदेश देण्याचे काम चिमुकल्यांनी केल्यामुळे मान्यवरांकडुन शाळेचे संस्थापक सचिव शिवसांब कोरे यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी गावातील विशेष कार्य करणाऱ्या काही व्यक्तींना सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख इमाम , हाके सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कदम,क्षीरसागर, स्वामी,मेकाले,धुळे,मोरे,हाके, आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

टिप्पण्या