मुख्य सामग्रीवर वगळा

होळकर महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी वार्षिकस्नेहसमेलन गाजले


राणीसावरगाव (प्रतिनिधी):-  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात विविध कार्यक्रमानी यंदाचे वार्षिकस्नेहसंमेलन गाजले आहे. यंदा झिंग झिंग झिंगाट, वाढीव दिसता राव इत्यांदी गाण्यांनी विद्याथ्र्यांना मंत्रमुग्ध केले.
 वार्षिकस्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. उत्तम देवकते यांची उपस्थिती होती. तर उदघाटक म्हणुन माजी प्राचार्य दिनानाथ फुलवाडकर तर मुख्याध्यापक रोडे, पोलिस अधिकारी दतात्रय कानगुले यांची उपस्थिती होती. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विजयी विद्याथ्र्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. प्रसिध्द गजलकार अरंविद सगर यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सगर यांच्या सखे पाहून गेल्यावर, तुला भेटून  गेल्यावर’ या गिताला तरूनांनी उत्स्फूर्त शब्द दिली.
 हैद्राबाद बिर्याणी या गाण्यावर प्रतिक कांबळे, अबुसिध्दिकी तांबोळी, चैतन कवडे, अमोल राठोड यांनी नृत्य केले. झिंग झिंग झिगाट यावर दिपाली हाके, अंकिता हाके, समिक्षा मेकाले, पिंगाग पोरी पिंगा या गाण्यावर पुनम धुळगुंडे, पुनम हाके, तर गौरव शिंदे, वैभव पुटेवाड शानदार डान्स केला.  बंजारा गितवर प्रतिक कांबळे, अमोल राठोड, विक्रांत चव्हाण, कृष्णा राठोड, तांबोळी, चैतन कवडे, प्रतिक कांबळे यांनी सादर केले. त्यानंतर नाकवा दादा नाकवा दादा या गाण्यावर प्रतिक्षा माने, वैष्णवी डुमणर यांनी नृत्य केले तर वारकाची किमया या नाटकात वारिक दयानंद मुकनर, सरपंच दत्ता यमगिर, कोतवाल महारुद्र माने, खुर्ची मारोती माने आणि बालाजी देवकत्ते यांचा सहभाग होता.
एकच राजा येथे जन्माला छत्रपती शिवाजी महाराज या गाण्यावर चैतन्य कवडे, प्रतिक कांबळे, स्वराज कानझाडे, प्रब्दुध्द बनाटे, प्रतिक्षा कांबळे, वैष्णवी शिंदे यांनी नृत्य केले. हे नृत्याला प्रक्षकांनी टाळयाचा वर्षाव केला. गाडी झुमक्याची या गीतावर पल्लवी पांडोळे, सुमित जाधव, महेश कोलेवाड, धिरज बुगनर, अब्दुल रहेमान, अमित राठोड, यांनी नृत्य केले. तर दिवाणी झालीस पोरीगं वयात आली ग पोरी या गीतावर शिल्पा देवकत्ते, लक्ष्मी माने, वैष्णवी डुमणर, दिपाली हाके यांनी नृत्य केले. आता वाजले की बारा ही लावणीवर भक्ती दुबासे, श्रावणी पवार, वैष्णवी स्वामी यांनी सादर केली. जलवा जलवा मेरा जलवा या गाण्यावर प्रतिक्षा कांबळे, अमित राठोड, धिरज राठोड, सुमित जाधव, अमोल राठोड यांनी नृत्य केले. या वार्षिकस्नेहसंमेलन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ.नरसिंगदास बंग, प्रा. डॉ. संतोष हंकारे, प्रा. प्रकाश नानोवर, प्रा. डॉ. तुकाराम बोबडे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी,पालक, प्राध्यापकवृंद मोठया संख्येने हजर होते. 

टिप्पण्या