Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

आंबेडकरांच्या पुतळ्याना पुष्पहार घालण्याची परवानगी द्यावी: आठवले  

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा घरीच साजरी करावी. तसेच घरावर अशोक चक्रांकित निळा झेंडा लावावा, असे आवाहन केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच जयंती दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे ज्या ठिकाणी आहेत, तिथे पुष्पहार अर्पण करण्याची परवानगी 5 जणांना द्यावी, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे.आठवले यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. कोरोना या महामारी विरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीम जयंती घरी थांबूनच साजरी करूया. कोरोनाविरुद्धचा मुकाबला जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण भीम जयंती साजरी करूया. त्याआधी कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्याचा संकल्प करा. संयम ठेऊन घरीच थांबा, असे आठवले म्हटले आहे.