मुख्य सामग्रीवर वगळा

पालघरमध्ये मॉब लिंचींग ; तीन महाराजांची हत्या

पालघरमधील मॉब लिचिंगची घटना धक्कादायक आणि अमानवी आहे.  या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेला कारणीभूत असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे आज केली आहे.पुणे/पालघर - पालघरमधील मॉब लिचिंगची घटना धक्कादायक आणि अमानवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेला कारणीभूत असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे आज केली आहे.चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयावरून शुक्रवारी रात्री गडचिंचले येथे इक्कोने प्रवास करणाऱ्या तीन प्रवाश्यांची दगड, कोयते, कुऱ्हाडीने वार करून  हत्या केल्याप्रकरणी 110 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी 9 आरोपी 18 वर्षांखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठविण्यात आले. तर अन्य 101 आरोपींना शनिवार, 18 एप्रिलला डहाणू कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्या करतेवेळी जमावात असलेले  काही आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत .घटनास्थळी गेलेल्या पोलिसांच्या गाडीवर ही जमवाने दगडफेक केली होती.पालघर राज्यात असलेल्या टाळेबंदीच्या वातावरणात रात्रीच्या वेळी चोर व दरोडेखोर यांचा ग्रामीण भागात वावर होत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये पसरली आहे. या भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच गुरुवारी रात्री डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथील ग्रामस्थांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या तीन व्यक्तींना चोर असल्याच्या गैरसमजातून दगड व इतर साहित्याने मारून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान दाभाडी–खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ गावकऱ्यांनी रोखले. या प्रवाशांकडे विचारपूस केल्यानंतर गावकऱ्यांनी दगड आणि व इतर साहित्याने मारहाण करण्यास सुरुवात केली, अशी माहिती समोर आली आहे. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती कासा पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा ही उपस्थित होता

टिप्पण्या