मुंबई – कोरोनारोगाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लाॅकडाऊन असताना देखील मुंबईतील बांद्रा रेल्वे स्थानकावर आपल्या मुळगावी जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांनी गर्दी केली होती.यावरून राज्यात चांगलेच राजकारण पेटले आहे.याच दरम्यान एबीपी माझा या मराठी वृतवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या वार्तांकनामुळे वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी दिनांक 14 एप्रिल रोजी गर्दी जमा झाली असा आरोप ठेवत त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.आज वांद्रे सत्र न्यायालयाने राहुल कुलकर्णी यांना जामीन मंजूर केला आहे.यानंतर बोलतांना राहुल कुलकर्णी हे म्हणाले की,लोकांचे प्रश्न मांडणे हे आमचं कर्तव्य आहे.ते आम्ही मांडतचं राहणार.आमच्या बातमीमध्ये कुठल्याही स्टेशनचा उल्लेख नव्हता.तरी देखील तो जोडण्यात येऊन मला झालेली अटक ही चुकीची आहे.ज्या वाधवान कुटुंबीयांवर ईडीने गुन्हे दाखल केलेले आहेत.त्यांना महाबळेश्वरमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले आणि मला मात्र पोलिसांनी अटक केली,मग मला वेगळा न्याय का? असा खडा सवालही राहुल कुलकर्णी यांनी सरकारला विचारला आहे.
टिप्पण्या