मुख्य सामग्रीवर वगळा

सामुहिक जबाबदारीचे भान ठेवुन कोरोना आपत्ती मध्ये सर्वानी कामाला लागावे:जिल्हाधिकारी श्री.दि.म.मुगळीकर



परभणी, दि. 6 – जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, अधिकारी यांचा प्रशिक्षण वर्ग जिल्हाधिकारी श्री. दि.म.मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. सुदैवाने जिल्हयात आज पर्यंत एकही रुग्ण कोरोना बाधीत झालेला नाही. भविष्यात जिल्हयात कोरोना बाधित रुग्ण होऊ नये याकरिता आपलाल्या कठोर आणि कडक उपाय अंगीकारावे लागतील असे श्री.मुगळीकर यांनी सांगितले.
योवळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पृथ्वीराज बी.पी., निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी श्री.अरविंद लोखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, नोडल ऑफीसर जिल्हा रुग्णालय परभणी डॉ.किशोर सुरवसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रमेश खंदारे, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, जिल्हयातील सर्व महसुल अधिकारी आणि  डॉक्टर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर पुढे बोलताना म्हणाले की, कोरोना बाधित रुग्णाची जागतिक, देशातील आणि राज्याची परिस्थिती पाहता कोणत्याही वेळी ही परिस्थिती कधीही तीव्र होईल, कधीही जिल्हात होऊ शकते कधीही कोन्हीही पॉझीटीव्ह निघु शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली तर पुढे काय ? आपला आपातकालीन नियोजन प्लॅन तयार असला पाहिजे.
ज्या कॉलनीत / नगरात / वार्डात / गावात रुग्ण सकारात्मक आला तर मॅपींग, सर्व्हेंक्षण, सर्व्हेक्षणासाठी टीम, कन्टेनमेंट झोन, बर्फर झोन मध्ये मायक्रो प्लॅनिग, सहबाधीत रुग्ण आहे किंवा नाही उपलब्ध वैद्यकीय सुविधा, अति जोखीम / कमी जोखीम यांची विभागणी. तात्काळ प्रतिसाद पथक तयार करावे, दोन आशा सेविकांचे एक पथक तयार करुन, चार पथकामागे एक वैद्यकीय अधिकारी आणि एक परिवेक्षक तयार करुन एका पथकाने प्रती दिन 50 घरांची पाहणी करुन अहवाल सादर करावा. संशयीत रुग्णाचे सव्हेंक्षण नोडल ऑफीसर यांनी करावे. उचित कार्यवाही करावी तसेच त्यांना सेल्फ कॉरटांईन बाबत मार्गदर्शन करावे.
बाधित रुग्ण आढळल्या नंतरच कन्टेनमेंट प्लॅन तयार करतो पण आपल्याला सुदैवाने वेळ मिळाला आहे. तर त्याचे मायक्रो नियोजन तात्काळ करुन सज्ज रहाण्यासाठी हे नियोजन करण्यात येत आहे. हे काम आपण सर्वजन स्व:तसाठी आणि समाजासाठी करणार आहोत तेंव्हा मी या विभागाचा नाही, मी त्या विभागाचा, हे काम माझे नाही असे काहीही चालनार नाही असा इशारा शासकीय सेवेतील सर्वाना जिल्हाधिकारी यांनी दिला. पुढे बोलतना ते म्हणाले प्रसिध्दी जरी जिल्हा प्रशासनाची होत असेल तरीही प्रत्यक्ष फिल्डवर तुम्ही काम करता हे श्रेय तुमचे आहे. परभणी जिल्हामध्ये तुम्हीच काम केले ते श्रेय तुमचेच असे सांगुन कोणतीही रिस्क घेऊ नका, स्व:तची काळजी घ्या, परभणी जिल्हयातुन कोणही बाहेर जाणार नाही आणि जिल्हयात कोणही येणार नाही यांची काटेकोर अंमलबजावणी करा. तरीही जिल्हयात कोणी आल्यास किंवा आढळल्यास त्यांना 14 दिवसासाठी कॉरटांईन करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी दिल्या.
                                                        

टिप्पण्या