मुख्य सामग्रीवर वगळा

भाजप नीती गुल शरद पवार पावरफुल; उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदे वरील मार्ग मोकळा होणार..!

भाजप नीती गुल शरद पवार पावरफुल; उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदे वरील मार्ग मोकळा होणार..!
मुंबई {प्रतिनिधी}
राज्यावर करण्याचे महासंकट उभे टाकले आहे या संकटास तोंड देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा प्रश्न निर्माण झाला आहे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद जाईल की राहील अशी राजकीय चर्चा रंगली आहे याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही तर महा विकास आघाडी सरकार नवीन पावले उचलण्याच्या तयारीत आहे यापूर्वी 9 एप्रिल राजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याबाबत ठराव मंजूर झाला होता मात्र उपमुख्यमंत्रीपद ही वैधानिक पद नसल्याचे कारण पुढे करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा ठराव ग्राह्य धरण्यास नकार दिला होता राज्य मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्र्यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता आहे या बैठकीत राज्यातील कोरोना संदर्भात आढावा तसेच संचारबंदी बाबत पुढे काय करणार यावर चर्चा होणार आहे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदार यासाठी मंत्रिमंडळ पुन्हा शिफारस करावी का या संदर्भात चर्चा अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे भाजपने आपत्तीत उद्धव ठाकरे यांना गोत्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय संविधानिक तसेच प्रशासकीय अनुभवापुढे भाजपची हवा गुल होत आहे अशी चर्चा पहावयास मिळत आहे मंत्रिमंडळाची बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली घ्यायची हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत त्यामुळे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत मंजूर केल्या जाणाऱ्या प्रस्तावाला आक्षेप घेता येणार नाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीसाठी नोटा द्या असा पर्याय सुचवला आहे परिणामी उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद नियुक्तीचा मार्ग मोकळा होईल असे चिन्ह दिसत आहेत

टिप्पण्या