अनंत करमुसे मारहाण प्रकरणानंतर आता शिवप्रतिष्ठान संघटना आणि भाजपाने मिळून आव्हाडांविरोधात समाजमाध्यमात जोरदार मोहिम सुरू केलीय. शिव्या, धमक्या अद्यापही सुरूच आहेत; पण यात लक्ष वेधून घेतलंय पोलिस अधिकारी सतिश कुलकर्णी यांनी ! आव्हाडांना हातपाय तोडायची धमकी कुलकर्णी यांनी दिल्याने आता आव्हाड समर्थकांनी कुलकर्णी यांच्याकडे मोर्चा वळवलाय. पुणे पोलिसांनी मात्र सतिश कुलकर्णी नावाचा अधिकारी आमच्याकडे नसल्याचं म्हटल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं आहे.
सतिश कुलकर्णी या नावाचं फेसबुकवर अकाऊंट आहे व ते २०१६ पासून कार्यरत आहे. महाराष्ट्र पोलिसांत नोकरीत असून पुण्यात स्वारगेट पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक असल्याची सोबत माहिती आहे. सतिश कुलकर्णी नाव चर्चेत आलं, विकास भानुदासराव देशपांडे या फेसबुक युजरच्या आव्हाडांसंदर्भातील पोस्टवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे हिजड्यासारखा सरकारी यंत्रणेचा आसरा काय घेतो. एकट्याने लढायचं होतं, तुझे हातपाय तोडले असते, अशा आशयाची प्रतिक्रिया सतिश कुलकर्णी यांनी पोस्टरवर दिली आहे. एक पोलिस अधिकारी अशा प्रकारची प्रतिक्रिया कशी काय देऊ शकतो, अशी विचारणा करीत कित्येकांनी महाराष्ट्र सरकारकडे कारवाईची मागणी केलीय. पण मूळात सतिश कुलकर्णी या नावाची कोणी व्यक्ति आहे का आणि ती खरंच पोलिसांत आहे का की ते फेक अकाऊंट आहे, असा सवाल निर्माण झाला आहे.
टिप्पण्या