: शासनाने दिव्यांग व्यक्तीसाठी विविध प्रकारच्या मदतीला धावून जात आहे. भोकर नगरपरिषदेच्या मार्फत अनुदान देण्याबाबत आदेश शासन स्तरावर दिले आहेत. याचाच भाग म्हणून शहराच्या हद्दीतील 174 दिव्यांगांना नगरपरिषद भोकरच्यावतीने वर्ष 2020-21 या चालु वर्षातील दिव्यांग व्यक्तींना निधीचे वाटप केले.
174 पैकी 104 लाभार्थीना बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात आले. उर्वरितरित ज्या लाभार्थीकडे बँक खाते नाही अश्या 70 लाभार्थी ना घरपोच धनादेश प्रत्येकी 2 हजार रूपये प्रमाणे असे एकुण तीन लाख 48 हजार रुपये दिव्यांग व्यक्तींना देण्यात आले आहेत. प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे त्यांच्या घरी जावुन सोशल डिस्टन्सींगचा वापर करित अनुदान वाटप केले.
यासाठी नगरअध्यक्षा सौ. संगीता विनोद चिचांळकर, उपनगरअध्यक्षा जरीना बेगम शेख युसुफ, विनोद पाटील चिचांळकर, मुख्याधिकारी प्रीयंका ठोंगे, सामाजीक कार्यकर्ते शेख युसुफ यांच्यासह सुनील कल्याणकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, प्रकाश तोटलू कार्यालय अधीक्षक, अविनाश पेंडकर प्रशासकीय अधिकारी, रामसिंह लोध लेखापाल, कमलाकर भगत समुदाय संघटक, साहेबराव मोरे, सचिन वैष्णव, दत्ता गौड अनंतवार, इमरान पटेल, जावेद ईमानदार, शेख शब्बीर, शेख मुखत्तार यांनी नगरपरिषद हद्दीतील सर्व दिव्यांग लोकांची यादी करून सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव असल्याने ही मदत केली.
ताळेबंदी असताना सोशल डिस्टन्सींगचा वापर करीत नगरपरिषदेने दिव्यांगाना अनुदान वाटप केले आहे. त्यांच्या रहात्या घरी जावुन चेक वाटप करण्याचा नगरपरिषदेच्या या उपक्रमाने शहरातील दिव्यागांना कोरोनाच्या संकटात अंशतः का होईना जगण्याचा आधार मिळाला आहे. सदरील दिव्यांगाना अनुदान वाटप करण्यासाठी भोकर नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या