मुख्य सामग्रीवर वगळा

औरंगाबादमध्ये सामूहिक नमाजासाठी जमलेल्यां नागरिकांनी केला पोलिसांवर हल्ला

औरंगाबाद {प्रतिनिधी
}देशासह राज्यातही कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 95 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व धार्मिक स्थळंही बंद ठेवण्यात आली आहेत. असं असूनदेखील औरंगाबादमध्ये काही लोक नमाज पठणासाठी एकत्र आले होते. यावेळी नमाजासाठी एकत्र आलेल्या लोकांना समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणातील 27 हल्लेखोरांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर या हल्ल्यात 1 पोलीस आधिकारी, 2 कर्मचारी जखमी झाले आहेत.बिडकीन शहरातील संभाजीनगर मार्गावरील अमिरनगर-प्रकाश नगर येथे मुस्लिम समाजातील काही लोकं धार्मिक स्थळी सामुहिक नमाद पठणासाठी एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

टिप्पण्या