मुख्य सामग्रीवर वगळा

खासदार संजय जाधवांनी धान्याची साडे सहा हजार किट वाटल्या पण फोटोचा तामझाम कश्याला..!

परभणी :  लॉकडाऊनचा परिणाम सर्वसामान्य, गोरगरीबांच्या जीवनावर प्रचंड झाला आहे. या विदारक परिस्थितीत देणाऱ्यांचे हजारो हात समोर आले आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव यांनीदेखील परभणी व जालना जिल्हयात धान्याच्या तब्बल साडेसहा हजार किटचे वाटप केले आहे.सध्या लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेक कटूंबासमोर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. घरातील कर्ता माणुसच घराच्या बाहेर पडू शकत नसल्याने घरात पैसा कसा येणार, हा प्रश्न रोजच्या कमाई करणाऱ्यासमोर उभा राहिला आहे. घरात पैसा नसल्याने धान्य आणने आवघड आहे. याची दखल घेत जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी तातडीने धान्याची व्यवस्था केली. अल्पावधीतच किराणा सामानाची यादी तयार करून एक महिना पुरेल इतके धान्य व आवश्यक किराणा साहित्याची किट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. केवळ परभणी शहरच नाही तर जिल्ह्यातील सर्व तालुके, ग्रामीण भाग व जालना जिल्ह्यात विस्तारलेल्या त्यांच्या मतदार संघातील गावांपर्यत त्यांच्या किटचे वाटप सुरु झाले आहे. दोन दिवसातच तब्बल साडेसहा हजार किटचे वाटप खासदार संजय जाधव यांच्या मार्फत करण्यात आले.  या संदर्भात बोलतांना खासदार संजय जाधव म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत लोक अडचणीत आहेत, त्यामुळे फोटो कशाला हवाय, पांडूरंग कृपेने मदत घडत आहे. मात्र या काळात प्रसिध्दी नको आहे.

टिप्पण्या