मुख्य सामग्रीवर वगळा

भिकेमध्ये मिळालेल्या आमदारकीचा उपयोग महाराष्ट्रासाठी करा”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, याच मुद्द्याचा धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “भिकेमध्ये मिळालेल्या आमदारकीचा उपयोग महाराष्ट्रासाठी करा”, असा टोला निलेश राणे
यांनी लगावला आहे
निलेश राणे नेमकं काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी स्वत:साठी नशिबवान आहेत. त्यांना सगळं बसल्या-बसल्या मिळालं. आता आमदारकीदेखील राज्यपालांनी बसल्याठिकाणी दिली. भिकेमध्ये मिळालेल्या आमदारकीचा उपयोग महाराष्ट्रासाठी करा”, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली. निलेश राणे वारंवार शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. याअगोदरही त्यांनी अशाप्रकारची टीका केली आहे.

टिप्पण्या