मुख्य सामग्रीवर वगळा

'तुझा दाभोलकर होणार', कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांना धमकी


मुंबई, 8 एप्रिल : तरुणाने केलेल्या मारहाणीच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड वादाच्य़ा भोवऱ्यात सापडले आहेत. जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरून हटवा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र एकीकडे हा वाद सुरू असतानाच आव्हाड यांना सोशल मीडियावरून थेट धमकी देण्यात आली आहे.तुझा दाभोलकर होणार,' अशी धमकी एका तरुणाने ट्विटरवरुन जितेंद्र आव्हाड यांना दिली आहे. काल झालेल्या मारहाण प्रकरणानंतर ही धमकी देण्यात आली आहे. एका कॅबिनेट मंत्र्यालाच अशा प्रकारे धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड काही लोकांच्या निशाण्यावर होते. त्यानंतर आता अशी उघड धमकी देण्यात आल्यानंतर याबाबत आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार, हे पाहावं लागेल

टिप्पण्या