औरंगाबादच्या अण्णाभाऊ साठे चौकात ही घटना घडली. बाहेर बाईक घेऊन फिरणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी विचारणा केली. यावेळी पोलीस आणि आरोपी शेख फारुख, शे.शारुख शे.फारुख, शेख आरबाज शेख शमीम यांच्यासह अन्य तीन जणांची बाचाबाची झाली. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या हातातली काठी घेऊन जनार्धन जाधव आणि दैनसिंग झोनवल या पोलीस कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली.
पोलिसांनी ट्रिपलसीट जाणारी एक गाडी थांबवली. आपली गाडी का थांबवली अशी हुज्जत घालत या गुंडांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलवून घेऊन झुंडीने पोलिसांवर हल्ला चढवला. पोलिसांचीच काठी घेऊन या टोळक्याने पोलिसांवर हल्ला केला .या हल्ल्यात दोन वाहतूक पोलिस जखमी झाले आहेत. त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे .हल्ला केल्यानंतर हे गुंड दुचाकीवरून पसार झाले. यानंतर तिघांना ताब्यात घेतलं आहे.महाराष्ट्रावर आलेल्या कोरोनाच्या संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिसांचे योगदानही लक्षणीय आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस अहोरात्र मेहनत करत आहेत. स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून पोलिसांकडून हे काम केले जात आहे.
टिप्पण्या