मुख्य सामग्रीवर वगळा

औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडल्यास महिलांसह रस्त्यावर उतरु, खासदार इम्तियाज जलील आक्रमक

औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यात मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास विरोध केला आहे. ‘रेड झोन’ असतानाही दारुची दुकाने उघडल्यास लॉकडाऊन तोडून ती बंद करायला भाग पाडू, महिलांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करु, असा इशारा जलील यांनी दिला आहे.रेड झोनमध्येही दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जर औरंगाबादमधील दुकाने उघडली, तर आम्ही लॉकडाऊनचे सर्व नियम तोडू आणि ही दुकाने जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडू. आम्ही बर्‍याच महिलांना रस्त्यावर येण्यास सांगू. दारु विक्री करुन आपल्या माता-भगिनींसाठी समस्या निर्माण करण्याची ही वेळ नाही.’ असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन दिला आहे. ‘कोरोना’च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे औरंगाबाद जिल्हा ‘रेड झोन’मध्ये येतो.निम्न वर्गातील स्त्रियांसाठी ही दारुची दुकानं मोठी समस्या आहे, त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. माझ्या मोलकरणीचा नवरा दारुच्या नशेत घरी आल्यावर रोज तिला मारहाण करतो. या कठीण काळात दारु विक्री करण्याची इतकी घाई का आहे? मग सर्वच दुकानं सुरु करा ना, केवळ दारुच्या दुकानांनाच ही विशेष सूट का?’ असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला आहे

टिप्पण्या