औरंगाबादः लोकप्रतिनिधी म्हणून नागरिक जेव्हा केव्हा संकटात असतील तेव्हा त्याच्या मदतीला धावून जाणे हा जर गुन्हा असेल, तर तो माझ्या हातून वारंवार घडले, मग माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तर मला त्याची पर्वा नाही. जिल्ह्यातील अनेक नेते क्वारंटाईन असलेल्यांना सोबत घेऊन फिरतात, पण त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. पण मी भाजपचा, विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे माझ्यावर मात्र गुन्हा दाखल केला जातो, अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल मत व्यक्त केले.संचारबंदी आदेश असतांना सुरेश धस आष्टी तालुक्यातील कंटोनमेंट झोनमध्ये जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेत होते. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज दुपारी त्यांच्या विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कुणी तरी आपल्या विरोधात प्रतिष्ठा पणाला लावून गुन्हे दाखल करायला लावत असल्याचा आरोप केल्यानंतर धस यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेश धस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.धस म्हणाले, आधी ऊसतोड मजुरांच्या मदतीला धावून गेलो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला, आता सांगवी पाटण गावांत बाहेरचे लोक आले म्हणून तिथले नागरिक घाबरले होते, म्हणून सोशल डिस्टन्सचा नियम पाळून मी त्यांना धीर द्यायला गेलो होतो. तरी माझ्यावर गुन्हा दाखल केला,मुळात सांगवी पाटण गावांत बाहेरचे लोक आल्याची माहिती मीच जिल्हा प्रशासनाला दिली होती.
पंचवीस जणांना घेऊन फिरणाऱ्यांचे काय..
कोरोनामुळे लोक भयभीत झालेले आहेत, अशात बाहेरून मोठ्या संख्येने लोक आपल्या गावात आल्याचे कळाल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. त्याची भिती घालवून धीर देण्यासाठी म्हणून मी तिथे गेलो होतो, लोकप्रतिनिधी म्हणून माझे ते कामच आहे. पण हा जर माझा गुन्हा असेल, तर तो माझ्या हातून वारंवार घडेल. त्यासाठी कितीही गुन्हे झेलण्याची माझी तयारी आहे.पण जिल्ह्यातील अनेक नेते सोबत पंचवीस लोकांचा लवजमा घेऊन फिरत असतांना फक्त माझ्यावरच गुन्हा दाखल का होतो? असा सवाल करतांनाच मी भाजपचा आमदार असल्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप धस यांनी केला. मला कुणावर टिका करायची नाही, पण जे नेते क्वारंटाईन झालेल्यांना सोबत घेऊन फिरतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, असे म्हणत धस यांनी संताप व्यक्त केला.

टिप्पण्या