मुख्य सामग्रीवर वगळा

धक्कादायक! लग्न लावाय गेले क्वारंटाईन झाले ; नवरीच कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यामधील मंडीदीपच्या सतलापूनमध्ये एक नवविवाहितेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नववधूला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ माजली आहे. नववधूने लग्नाआधी ताप आला म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, लग्नानंतर तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे नववधूला थेट भोपाळच्या एम्समध्ये तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.तसेच लग्नसोहळ्याला उपस्थित असलेले दोन्ही पक्षाकडील कुटुंबीय, पाहुणे आणि लग्न लावणाऱ्या भटजीसह ३२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यामधील ही घटना आहे. हा लग्नसोहळा १८ मे रोजी सतलापूरमध्ये पार पडला. तरही  तरुणी भैपाळच्या जाटखेडीमध्ये राहते.

टिप्पण्या