मुख्य सामग्रीवर वगळा

रामोजी पब्लिक स्कूल येथे डॉक्टर डे साजरा.

कौठा परिसरातील रामोजी पब्लिक स्कूलच्या वतीने दिनांक १ जुलै हा जागतिक डॉक्टर ' डे  दिनानिमित्याने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रसिद्घ बालरोग  तज्ञ डॉ.श्रीराम श्रीरामे, डॉ.महेश काबरा,डॉ. किरण मंडले, डॉ.होमिला परे, यांचा सत्कार करून डॉक्टर डे ' साजरा करण्यात आला.
या जागतीक डॉक्टर डे' निमित्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. श्रीराम श्रीरामे, यांनी मागील वर्षात आलेल्या कोरोना महामारी मुळे अनेकांना त्रास झाला.तो त्रास केवळ आपण अरोग्याची काळजी  न घेतल्याने उदभवला होता. प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्यानी आपल्या अरोग्याची  काळजी घेताना आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे.त्या मुळे अनेक जंतू आपल्या शरीरात जाऊन आपल्या शरीरातील विषानु  वाढवू शकतात.त्यासाठी जेवणापूर्वी हात पाय स्वच्छ  धुवावे-सकस आहार घेतला पाहिजे.आहारात पाले भाज्या कडधान्य,दूध ,दही यासारखे व्हीटामीन देणारे अन्न सेवन केले तर आपले आरोग्य सुदृढ राहील असेही ते म्हणाले यावेळी अनेक विध्यार्थ्यांच्या आरोग्या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी शाळेचे  मुख्याध्यापक व.संचालक डॉ.शिवाजी गोरे,स्वाती बरीदे,अर्चना पाठक,कृष्णा काकडे,सारीका कवटगी,यांनी ह्यासाठी परिश्रम घेतले..

टिप्पण्या