मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझ्या शेतातून जायचं नाही, मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांची शेतकऱ्याने वाट अडवली, अंत्यसंस्कार दिवसभर रखडले

  रस्ता नाही म्हणून गरोदर मातेला जीव गमवावा लागला, ही घटना ताजी असतानाच इगतपुरीत शेतातून मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांची शेतकऱ्याने वाट अडवल्याने मृतदेहावरील अंत्यसंस्कार दिवसभर रखडले. नाशिक  : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये. शेतातून मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांची शेतकऱ्याने वाट अडवल्याने मृतदेहावरील अंत्यसंस्कार दिवसभर रखडले. इगतपुरी तालुक्यात रस्त्याअभावी गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रस्ता नसल्याने मृतदेहावरील अंत्यसंस्कार करण्यास विलंब झाला. टाके घोटी येथील आदिवासी कातकरी पाड्यावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. त्यामुळे त्या वाडीतील नागरिक एका शेतकर्‍याचा शेतातील पायवाटेने ये-जा करत असतात. कातकरी पाड्यावरील वस्तीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत न्यायला एकमेव पायवाटेने शेतातून जात असतांना संबंधित मालकाने इथून मृतदेह नेऊ नका असे सांगत मज्जाव केला. म्हणून हा अंत्यविधी दिवसभर रखडला. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर आणि इगतपुरी पोलीस यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ...

Imtiaz Jalil News : ठेवीदारांनो सहकारी बॅंका, सोसायट्यांमधील तुमचे पैसे काढून घ्या..

Marathwada : छत्रपती संभाजीनगर शहरातील आदर्श सहकारी पतसंस्थेत झालेल्या दोनशे कोटींहून अधिकच्या घोटाळ्यात ठेवीदारांच्या पाठीशी उभे राहिलेले एमआयएमचे खासदार (Imtiaz Jalil News) इम्तियाज जलील यांनी ठेवीदारांना आवाहन केले आहे. कोट्यावधींचा घोटाळा करून सर्वसामान्यांच्या कष्टाचा पैसा गिळंकृत करणाऱ्या घोटाळेबाजांच्या पाठीशी भ्रष्ट व्यवस्था उभी आहे. (Marathwada) त्यामुळे तुमचा पैसा सहकारी बॅंका, सोसायट्यांमध्ये सुरक्षित नाही. खूप उशीर होण्याआधीच आपले सर्व पैसे सहकारी बॅंका, पतसंस्थांमधून काढून घ्या, असे आवाहन (Imtiaz Jalil) इम्तियाज यांनी केले आहे. एका इंग्रजी दैनिकातील वृत्ताचा हवाला देत त्यांनी ठेवीदारांना हे आवाहन केले आहे. मराठवाड्यातील दहा आणि राज्यातील तब्बल १०३ सहकारी बॅंका या आरबीआयच्या रडारवर असल्याचा दावा करण्यात आला आहे. या बॅंकावर कधीही कारवाई केली जावू शकते. असे झाले तर सर्वसामान्यांच्या कोट्यावधींच्या ठेवी अडचणीत येणार आहेत. (Scams) या पार्श्वभूमीवर इम्तियाज यांनी ठेवीदारांना आवाहन केले आहे. खूप उशीर होण्यापूर्वी फसवणूक झालेल्या सहकारी बँका आणि सोसायट्यांमधून तुमचे सर्व पैस...