Marathwada : छत्रपती संभाजीनगर शहरातील आदर्श सहकारी पतसंस्थेत झालेल्या दोनशे कोटींहून अधिकच्या घोटाळ्यात ठेवीदारांच्या पाठीशी उभे राहिलेले एमआयएमचे खासदार (Imtiaz Jalil News) इम्तियाज जलील यांनी ठेवीदारांना आवाहन केले आहे.
कोट्यावधींचा घोटाळा करून सर्वसामान्यांच्या कष्टाचा पैसा गिळंकृत करणाऱ्या घोटाळेबाजांच्या पाठीशी भ्रष्ट व्यवस्था उभी आहे. (Marathwada) त्यामुळे तुमचा पैसा सहकारी बॅंका, सोसायट्यांमध्ये सुरक्षित नाही. खूप उशीर होण्याआधीच आपले सर्व पैसे सहकारी बॅंका, पतसंस्थांमधून काढून घ्या, असे आवाहन (Imtiaz Jalil) इम्तियाज यांनी केले आहे.
एका इंग्रजी दैनिकातील वृत्ताचा हवाला देत त्यांनी ठेवीदारांना हे आवाहन केले आहे. मराठवाड्यातील दहा आणि राज्यातील तब्बल १०३ सहकारी बॅंका या आरबीआयच्या रडारवर असल्याचा दावा करण्यात आला आहे. या बॅंकावर कधीही कारवाई केली जावू शकते. असे झाले तर सर्वसामान्यांच्या कोट्यावधींच्या ठेवी अडचणीत येणार आहेत. (Scams) या पार्श्वभूमीवर इम्तियाज यांनी ठेवीदारांना आवाहन केले आहे.
खूप उशीर होण्यापूर्वी फसवणूक झालेल्या सहकारी बँका आणि सोसायट्यांमधून तुमचे सर्व पैसे काढून घ्या. तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी सरकार तुम्हाला फारशी मदत करणार नाही. घोटाळेबाजांना भ्रष्ट व्यवस्थेचा पूर्ण पाठिंबा आहे, असे ट्विट इम्तियाज यांनी केले आहे.
तत्पुर्वी इम्तियाज यांनी विधीमंडळ अधिवेशनात राज्य सरकारने सर्व सामान्य लोकांच्या बॅंका व पतसंस्थांमधील ठेवींची हमी घ्यावी. दोन दिवसात यांची घोषणा सभागृहात करावी, अशी मागणी केली होती. दोन दिवसानंतर आम्ही बॅंका आणि पतसंस्थांच्या समोर पैसे काढण्यासाठी ठेवीदारांच्या रांगा लावू, असा इशारा देखील त्यांनी दिला होता.
दोनशे कोटीहून अधिकच्या आदर्श पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणी अध्यक्ष अंबादास मानकापे यांच्यासह तीन संचालकांना अटक करण्यात आली आहे. तसेच या घोटाळ्याची चौकशी विशेष पथकाकडून करण्याची घोषणा पोलिस आयुक्तांनी केली आहे.
टिप्पण्या