Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

विद्यार्थ्यानी सीईटी बद्दल अधिक जाणून घ्या

महासंवाद प्रतिनिधी मुबंई
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमांसाठी यंदा एकच घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यानुसार राज्यभरातून तब्बल ४ लाख २४ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले असून यात सर्वाधिक विद्यार्थी हे मुंबईचे असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, वैद्यकीय आणि इतर काही अभ्यासक्रमासाठी एमएचटी - सीईटी घेण्यात येणार आहे. येत्या ५ मे रोजी ही परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार या परीक्षेसाठी सर्वाधिक अर्ज मुंबई व उपनगरातून ४८ हजार आणि त्यापाठोपाठ पुणे जिल्हयातील ४५ हजार ९३६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले असल्याचे दिसून आले आहे. तर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ३१ मार्च पर्यंत शुल्क भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी मुंबई, पुणे पाठोपाठ वर्धा जिल्ह्यातून २६ हजार ६८२ अर्ज आणि ठाणे जिल्हयातून ४५ हजार ९३६ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ८६ हजार ३८४ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे शुल्क भरल्याचे यावेळी स्पष्ट केले.