@जिल्हा परिषद गट व त्यातील समाविष्ट गावे
@पाथरी तालुक्यातील स्थिती : अनेकांचे मतदार संघ झाले राखीव
@तदार संघ झाले आरक्षित : पुढारी आले अडचणीत
पाथरी(महासंवाद) : लोकसंख्येच्या आधारे पाथरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकागटासोबतच पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. पूर्वीच्या चारही गटातील गावांची अदलाबदल झाल्याने इच्छुकांना नवख्या गावात नवीन डाव मांडावा लागणार आहे. त्याच बरोबर चार गट सर्वसाधारण महिलांसाठी सुटल्याने मात्तबरांची गोची झाली असून अनेकांना पडद्याआड राजकारण करावे लागणार आहे.
तालुक्यात नवीन गट वाढल्याने पूर्वी अस्तित्वात असलेल्या गटात फेरबदल झाले. पाच वर्षे गावांशी संपर्क ठेऊन असलेल्या इच्छुकांना आता नवीन गावात जाऊन राजकीय खेळी आणि संपर्क वाढवावा लागणार आहे. काहींनी तर कामाला सुरुवात केल्याचे दिसूत येत आहे.
नवीन गट आणि गणाची पूनररचना होत असताना गटाचे आरक्षणही अनेकांची डोके दु:खी ठरले आहे. चार गट सर्वसाधारण महिलासाठी सुटले आहे. यात हदगाव, देवनांद्रा, कासापुरी, लिंबा या गटाचा समावेश आहे. पुनररचनेमुळे हदगाव गटातील झरी, देवेगाव, बोरगव्हाण, सीमुरगव्हाण, ही चार गावे देवनांद्रा गटात गेली आहेत. तर देवनाद्रा गटातील संपूर्ण वाघाळा गण हा नवीन लिंबा गटात समाविष्ट झाला आहे. कासापुरी गटातील पाथरगव्हाण खु. हे गाव हदगाव गटात गेले आहे. तर तुरा हे गाव लिंबा गटात आणि मसाला हे गाव बाभूळगाव गटात गेल्याने कासापुरी गटातील ३ गावे कमी झाली आहेत.
नवीन लिंबा गटात वाघाळा गणा सोबतच बाभूळगाव गटातील लिंबा, विटा, मुदगल, फुलरवाडी, आनंदनगर ही गावे समाविष्ट झाली आहेत. बाभूळगाव गटात मसला वगळता सर्व गावे जुन्या गटातील आहेत. /(वार्ताहर) ■ कासापुरी गट (सर्वसाधारण महिला) कासापुरी गण- कासापुरी, पाथरगव्हाण बु., जवळा झुटा, नाथ्रा, मंजरथ. रामपुरी गण- रामपुरी, ढालेगाव, निवळी, पाटोदा, गोपेगाव, मरडसगाव, बानेगाव■ हादगाव गट (सर्वसाधारण महिला) हादगाव गण- हादगाव बु., वरखेड, डोंगरगाव, किन्होळा, पाथरगव्हाण खु. रेणाखळी गण- रेणाखळी, वडी, खेर्डा, खेडुळा, सारोळा खु.■ देवनांद्रा गट (सर्वसाधारण महिला) देवनांद्रा गण- देवनांद्रा, रेणापूर, पोहेटाकळी. देवेगाव गण - देवेगाव, झरी, सिमुरगव्हाण, बोरगव्हाण, बांदरवाडा■ बाभूळगाव गट (ओबीसी) बाभूळगाव गण- बाभूळगाव, लोणी, गुंज खु., मसला, मसला तांडा, कानसूर गण- कानसूर, कानसूर तांडा, तारुगव्हाण, उमरा, अंधापुरी, गौंडगाव, डाकू पिंपरी ■ लिंबा गट (सर्वसाधारण महिला) लिंबा गण- लिंबा, फुलारवाडी, लिंबा तांडा, विटा बु., मुदगल, आनंदनगर. वाघाळा गण- वाघाळा, चाटे पिंपळगाव, सारोळा बु., बाबूलतार, टाकळगव्हाण, जैतापूरवाडी, तांडा, तुरा. जिल्हा परिषद गट व त्यातील समाविष्ट गावे ■ जि.प.चे विद्यमान सभापती दादासाहेब टेंगसे यांना पुनर्रचीत देवनांद्रा गटातच पडद्याआडून राजकारण करावे लागणार आहे. याच गणातील अर्चना शंतनू पाटील यांचा गण आरक्षित झाल्याने त्यांचाही दावा पुढे येण्याची चर्चा आहे. हदगाव गटात राष्ट्रवादीकडून भावनाताई नखाते प्रबळ दावेदार आहेत. कासापुरी गट हा राकाँचा बालेकिल्ला मानला जातो. येथे माजी जि. प सदस्य पप्पू घाडगे तर रामपुरीचे कल्याण चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा आहे. लिंबा गटात राकाँचे प. स. सभापती तुकाराम जोगदंड आणि माधवराव जोगदंड तर शिवसेनेकडून माणिक अप्पा घुंबरे हे तयारीत आहेत. बाभूळगाव गट ओबीसीसाठी सुटल्याने सेनेचे तालुका प्रमुख रवींद्र धर्मे, सेनेचे मुंजाभाऊ कोल्हे, राकाँचे सुभाष कोल्हे, एकनाथ शिंदे, अशोक गिराम यांची चांगलीच कोंडी झाली आहे
टिप्पण्या