मुख्य सामग्रीवर वगळा

श्रीराम नागरगोजे ( मामा ) निवडणूक लढवणार. !

श्रीराम नागरगोजे ( मामा ) निवडणूक लढवणार.!
**************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) राणीसावरगाव पंचायत समिती निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात उभे आहेत.मात्र अनूभवी व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना उभारण्याची संधी मिळाली तर पंचायत समिती गटातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिकीट मिळाले तर भा.ज.पा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम नागरगोजे ( मामा ) हे उभा राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.तसे पहाता राणीसावरगाव परिसरातील सामाजिक कामात सहभागी होउन कार्य करीत असल्याचे दिसते.त्याचे उदाहरण म्हणजे राणीसावरगाव येथील नरसिंह मंदिराच्या जिर्नोधार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्याच प्रमाणे शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे 40 वर्षापासून सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.त्यामुळे निवडणुकीत याचा विचार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टिप्पण्या