मुख्य सामग्रीवर वगळा

पिंपळदरी पंचायत समिती अनंतराव मुंढे यांनी लढवावी

पिंपळदरी पंचायत समिती अनंत मुंढे यांनी लढवावी.!
*************************************
पिंपळदरी( प्रतिनिधी ) पिंपळदरी पंचायत समिती निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात ऊतरणार आहेत.यामध्ये अनंतराव रामकिशन मुंढे (पाटिल) यांचे नाव पिंपळदरी पंचायत समिती गटातून सर्वसामान्य मतदारातून पुढे येत आहे. कारण एकनिंष्ठ,अनूभवी आणि विकास कामाची तळमळ असलेले हे ऊमेदवार असल्याचे मतदारातून बोलले जात आहे.पिंपळदरी , बोर्डा , दामपूरी , वागदरी , आनंदवाडी ही गावे स्वकियांची असल्यामुळे त्यांना ही निवडणूक सोपी जाईल यात शंकाच नाही जनतेतील मनमिळावू स्वभाव असल्यामुळे तालूक्याच्या राजकारणात व समाज कार्यात तेवढीच ओळख असल्यामुळे विकास कामासाठी धडपडही तेवढीच त्यांच्या स्वभावातून दिसून येते.पिंपळदरी पंचायत समिती गटातून निवडणूक लढवित असताना ते भाजपा या पक्षाकडून की, रासपा कडून निवडणूक लढणार की आनखी दुस-या कोणत्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत हे माञ काही दिवसांनी पुन्हा आपल्या समोर महासंवाद न्युज घेऊन येणार आहे.

टिप्पण्या