मुख्य सामग्रीवर वगळा

खुर्चीसाठी नाही तर विकासासाठी रिंगणात :- लवटे

खुर्चीसाठी नाही तर विकासासाठी रिंगणात :- लवटे
**************************
पालम (प्रतिनिधी) पालम तालुक्यातील चाटोरी जिल्हा परिषद सर्कलचा विकास म्हणावा तसा झाला नाही आपण खुर्चीसाठी नाही तर विकासासाठी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे मत हिरकणी स्कूलचे अध्यक्ष अशोक लवटे व्यक्त केले आहे.
चाटोरी जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण महिलेसाठी सुटली आहे.यात 25 हजार मतदारांची संख्या आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापने पासून पक्ष वाढवण्यासाठी सायकल स्वारी करत गाव तेथे शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत. अशोक लवटे यांनी 2006 ला चाटोरी पंचायत समिती निवडणूक लढविली होती .मा महादेवजी जानकर यांनी गाव तेथे सभा घेतल्या होत्या त्यात दुसर्‍या क्रमांकावर राहिले होते.सर्कलमध्ये परिचित असल्याने फायदा होईल यात शंका नाही
विशेष म्हणजे लवटे हे छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, डॉ बाबासाहेब आंबेडकर , आण्णाभाऊ साठे , अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर व्याख्याते म्हणून परिचित आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

टिप्पण्या