मुख्य सामग्रीवर वगळा

चोरीचा तपास जलद गतीने करण्याची मागणी

चोरीचा तपास जलद गतीने करण्याची मागणी
**************************
लातूर(प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील सोनावळा येथील संगमेश्वर पंढरीनाथ नागरगोजे यांच्या घरातील चोरीचा तपास जलद गतीने करण्यासाठी युवा सम्राट मित्र मंडळ महाराष्ट्रच्या वतीने पोलीस निरिक्षक याना निवेदन देण्यात आले .
निवेदनात संगमेश्वर पंढरीनाथ नागरगोजे रा. सोनवळा ता . जळकोट जि. लातुर येथील रहिवासी असुन ते मागील १ वर्षापासुन पंचायत समिती जळकोट समोर शंकर आचमारे याच्याकडे भाड्याने राहत आहेत.मात्र दि . 08/10/2016 रोजी ते घरी नसताना दुपारी अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन त्यांच्या घरून रोख रक्कम 72, 000/ रू . घेऊन पोबरा केला आहे तरी या चोरीचा तपास करून योग्य न्याय दयावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर प्रदेशाध्यक्ष - हर्षवर्धन गायकवाड, तालुका अध्यक्ष - संतोषभैय्या गडकरे तालुका सचिव - सोनकांबळे दिलीप , ता उपकार्याध्यक्ष- ज्ञानेश्वर हलगरे युवा नेते - श्रीकांत नामवाड, अक्षय जाधव आदींच्या सह्य़ा आहेत

टिप्पण्या