Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या -सरपंच प्रा.पि.एल राठोड

सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या -सरपंच प्रा.पि.एल राठोड
**************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) येथील पशु दवाखान्यास नविन इमारतीच्या बांधकामासह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी पशुप्रदर्शनात सरपंच प्रा.पि.एल राठोड यांनी केली.राणिसावरगाव येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पशु प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याचे अध्यक्ष डिगांबर कर्‍हाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास मुंडे, जि.प.सदस्य भगवान सानप, शिवाजी निर्दुड,डॉ.डी.टी वाघमारे, सरपंच प्रा.पि.एल राठोड, डॉ.सावणे. भुषण गळाकाटू, धनंजय जाधव, रमेश कुलकर्णी, नारायण जाधव, आप्पाराव जाधव,सोमनाथ कुदमुळे, शिवप्रसाद कोरे, मधुकर जाधव, राहुल बनाटे, कल्याण जाधव,तुकाराम हाके,रमेश महामुने, ज्ञानेश्वर जाधव, उमाकांत कुदमुळे,प्रकाश गळाकाटू आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सरपंच म्हणाले की जिल्ह्यात राणीसावरगाव हे मोठे गाव आहे त्यामानाने पशु पालकांना योग्य बक्षीस वितरण होत नाही अशी खंत व्यक्त केली गतवर्षी याच ठिकाणी भाजप नेते श्रीनिवास मुंडे पाच लाख रुपये वाढीव निधी देउ असे जाहीर केले होते मात्र तसे झालेले दिसून येत नाही यावर त्यांनी भर दिला. याच प्रमाणे पशू दवाखान्यास जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारावी यासह इतर अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी केली.यासाठी लागणारे ठराव आपणास पाठवण्यात असे ते म्हणाले यावेळी सुत्रसंचलन डाॅ सावणे तर आभार डॉ मानकेश्वर यांनी मानले