राणीसावरगाव विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही :- मुंढे *************************************
40 लाख रुपये निधी मंजूर...
*************************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी )
राणीसावरगाव जिल्हा परिषद सर्कलचा सर्वागीण विकास करण्यासाठी मी कठीबद्ध आहे.सध्या राणीसावरगाव येथील सार्वजनिक विकास कामांसाठी 40 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती गंगाखेड पंचायत समितीचेमाजी सभापती मा.श्रीनिवास मुंढे यांनी दिली आहे.तसेच आपल्या राणीसावरगाव विकास करण्यासाठी दुसर्या यादी मध्ये १ कोटी ८० लाखांची तरतुद केली आहे. असे असले तरी विकासासाठी मी कधीही पुढे राहणार आपले राणीसावरगांव स्वच्छ शहर,सुंदर शहर करण्यासाठी पुढील १ कोटी ८० लाख रुपये यांचा आरखडा तयार असुन लवकरच पाठपुरवठा करून मंजूरी मिळवून विकास कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे
टिप्पण्या