ज्वारीची शपथ साहेब
उमेदवार आला दारात
मतदार होते घरात
ओरडून म्हणाला जोरात
पटकन या दारात
मी उमेदवार आहे
मला मतदान करा
पण आधी ...
ज्वारी हतात धरा
आमच मतदान
तुम्हाला आम्ही देऊ
पण पाच वर्षांत
विकास करा भाऊ
उमेदवार म्हणाला
हो करतो तुमची काम
घेऊन माझ्या
देवाची हो आण
तेव्हा मतदार म्हणाले
असे येतात जातात
आमची एवढी ज्वारी साहेब
घ्या तुमच्या हातात
किसी का किसीसे कनेक्शन है !
बुरा न मानो इलेक्शन है
कवी:- संभाजी महामुने
राणीसावरगावकर
टिप्पण्या