Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

संभाजी ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष पदी अतुल मोरे तर सचिव पदी सुनिल पौळ

गंगाखेड {प्रतिनिधी} दि.०८ जुलै रोजी गंगाखेड येथील शासकीय विश्राम ग्रहावर संभाजी ब्रिगेडची सर्व साधारण बैठक घेण्यात आली होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव कदम आणि प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सचिव दिनकरराव गरुड , परभणी महानगर अध्यक्ष सुरज लहाने हे होते.
यावेळी या बैठकीत संभाजी ब्रिगेडची कार्यकारणी पुढील प्रमाणे संभाजी ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष पदी अतुल मोरे तर सचिव पदी सुनिल पौळ , उपाध्यक्ष लक्ष्मन जाधव , तालुका कार्याध्यक्ष सुरेश कोरडे , कोषाध्यक्ष गजानन लाडे, प्रसिद्धी प्रमुख कृष्णा सूर्यवंशी, सहसचिव गजानन गिरी, संघटक अविनाश कराळे, सदस्य गोपीनाथ बडवणे, अविनाश मुंढे, अशोक गादगे तसेच गंगाखेड तालुक्यातील संभाजी ब्रिगेड चे असंख्य कार्यकर्ते उपस्तित होते.