मुख्य सामग्रीवर वगळा

संदीप मोझर यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा!

सातारा जिल्ह्यातील राजरोसपणे सुरु असलेले अवैध दारु व मटका व्यवसाय बंद करावेत अन्यथा आम्ही ते उखडून टाकू; मनसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप मोझर यांचा निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला इशारा!
मटका व अवैध दारु मुळे खुप लोकांचे संसार धुळीस मिळाले आहेत. मटक्यापाई तर कित्येकांनी आपल्या घरातील सोने, किंमती वस्तू गहाण ठेऊन वेळ पडली तर विकून या मटका व अवैध दारुच्या मृगजळात तरूण पिढी अडकत चालली आहे. आजकाल हा व्यवसाय फोन, व्हाॅटस्ॲप, इंटरनेट यांच्या माध्यमातून जोमाने चालु आहे.
१५ ऑगस्ट पुर्वी मटका व अवैध दारुची हि किड बंद करण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणेने विषेश मोहीम राबवावी. असे झाले नाही तर अवैध दारुधंदे व मटक्याच्या टपऱ्या उखडून टाकू, असा इशारा मनसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी दिला आहे.

टिप्पण्या