खंडाळा (प्रतिनिधी)-तुषार पवार
वैजापूर तालुक्यातील बोरसर येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त संगीतमय श्रीरामकथा ज्ञानयज्ञ महोत्सव ह.भ.प.श्री.विनोद ‘कृष्ण’ शास्त्रीजी महाराज नायगव्हाणकर श्रीधाम वृंदावन (कृष्ण जन्मभूमी) यांचे दि.१६ जुलै (रविवार) रोजी पासून दि.२३ जुलै (रविवार) रोजी पर्यंत आठ दिवसाची श्रीरामकथा ज्ञानयज्ञ प्रारंभ झाले आहे. दि.२२ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रंथ दिंडी व कलश मिरवणूक आणि रात्री ९ वाजता हरिकीर्तन तसेच दि.२३ जुलै रोजी सकाळी १० ते १२ वा. या वेळेत ह.भ.प.श्री.विनोदकृष्ण शास्त्रीजी नायगव्हाणकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.या कार्यक्रमाचे स्थळ श्रीक्षेत्र विष्णू मंदिर बोरसर तसेच या कार्यक्रमाचे आयोजक बोरसर ग्रामस्थ या कथेसाठी पंचायत समिती सदस्य अरुण होले,मा.सरपंच प्रकाश होले,मा.सरपंच अरविंद शेवाळे,मा.सरपंच सोपान पुंड,मा.चेअरमन भाऊसाहेब पवार,फकीर पवार,नवनाथ होले,देविदास जाधव,अण्णा शेवाळे,सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ,विनायक नगर,भिवगाव,भिंगी,सुदामवाडी.
टिप्पण्या