मुख्य सामग्रीवर वगळा

मोबाइल हॅक होतोय कसा ? क्लिक करा घ्या जाणून

संगणक तज्ज्ञ प्रा. योगेश हांडगे यांचा सल्ला

शहरात अवघ्या काही तासांत ३१ जणांचे व्हॉट्स अॅप आणि फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याच्या तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे आल्या असून त्यापैकी २९ तक्रारी अकाऊंट हॅक करून अश्लील संदेश पाठविण्यात येत असल्याच्या आहेत. हॅकर्सनी महिलांना लक्ष्य केले असल्याचे यामुळे उघड होत असल्याने समाज माध्यमांचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये अस्वस्थता पसरल्याने अशा तक्रारींमुळे समाज माध्यमांचा भ्रमणध्वनीद्वारे वापर करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला संगणकतज्ज्ञ प्रा. योगेश हांडगे यांनी दिला आहे.समाज माध्यमांमध्ये असलेले अकाऊंट हॅक करून त्याचा उपयोग अश्लील संदेश पाठविण्यासाठी करण्यात येत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने आता समाज माध्यमांमध्ये अकाऊंट असलेल्यांनीच खबरदारी घेणे आवश्यक झाले असल्याचे प्रा. हांडगे यांनी म्हटले आहे. भ्रमणध्वनीद्वारे इंटरनेटचा वापर अनेक जण करू लागले आहेत. वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने संगणकाऐवजी आता भ्रमणध्वनीवरून सायबरहल्ले होऊ लागले आहेत. त्याचे प्रमाणही वाढत आहे. भ्रमणध्वनी नेमके कसे हॅक केले जातात, याची माहितीही हांडगे यांनी दिली आहे. जीएसएम तंत्रज्ञान असलेल्या भ्रमणध्वनीला हॅक करण्यासाठी लागणारे हार्डवेअर आरामात जोडता येत असल्याने ते हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात. हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून काही विशिष्ट ‘लिंक’ नागरिकांना पाठविली जाते. नागरिकांना भ्रमणध्वनी करून लिंक पाठवलेले मेल, संदेश उघडण्यास सांगण्यात येते. अनेकदा सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव करून नागरिकांशी संपर्क साधण्यात येतो. हॅकर्स केवळ एक संदेश पाठवून आपल्याला हवा त्याचा भ्रमणध्वनी हॅक करून त्यावरील संभाषण, माहिती, छायाचित्र दूरवरून मिळवू शकतात, असे प्रा. हांडगे यांनी स्पष्ट केले आहे.हॅकिंगमध्ये अनेकदा भ्रमणध्वनीत साठविलेली माहितीही बदलली जाते. तसेच अनेक वेळा डेटा हॅक करून बँक खात्यातून परस्पर रुपये दुसऱ्या खात्यात वळविले जातात. भ्रमणध्वनीत सुरू असलेलेसर्व अॅप्लिकेशन अगदी मेल, फेसबुक, ट्विटरसुद्धा हॅक केले जातात. मेलमध्ये असलेल्या डाटाचा वापर करत ‘क्रेडिट, डेबिट’ कार्डची गोपनीय माहिती मिळवून त्याद्वारे लाखो रुपये काढले जातात. हॅकर्सकडून शक्यतो लूटमार करण्यासाठी रात्रीची वेळ निवडण्यात येते. हॅकर्सने भ्रमणध्वनी हॅक केला असल्याने त्यांना पैशांचे ऑनलाइन व्यवहार करताना लागणारा ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) लगेचच मिळतो. या पासवर्डचा वापर करून ते ऑनलाइन लूटमार करतात.व्हॉट्स अॅप, फेसबुक अकाऊंट हॅक करून अकाऊंटद्वारे अर्ली संदेश पाठविले जातात. व्हॉट्स अॅप किंवा फेसबुक पुनस्र्थापित (रिइन्सॉटल) करताना संबंधित कंपनीकडून एक ओटीपीपाठवण्यात येतो. या पासवर्डच्या मदतीनेचे आपण संबंधित अॅप्लिकेशन वापरू शकतो. हॅकर्स परिचितांपैकी एकाचा भ्रमणध्वनी हॅक करून त्यावर व्हॉट्स अॅप रिइन्सॉटल करण्याचा ओटीपी मिळवून व्हॉट्स अॅप हॅक करतात. नंतर ‘कॉन्टॅक्ट लिस्ट’मध्ये पोहचून इतरांचे भ्रमणध्वनी हॅक करण्याचा सपाटा सुरू करतात.आपला भ्रमणध्वनी हॅक झाल्याचे समजण्याची काही लक्षणे आहेत. त्यात अचानक ‘रिस्टार्ट’ होणे, भ्रमणध्वनी एकदम बंद पडणे, आपोआप एसएमएस पाठवला जाणे, अॅप्स अनपेक्षितरीत्या सुरू किंवा बंद होणे यांचा त्यात समावेश आहे. भ्रमणध्वनी हॅक होऊ नये म्हणून काळजी घेण्याची सूचना प्रा. हांडगे यांनी केली असून त्यात ब्ल्यू टूथ वापरत असाल तर ते बंद किंवा ‘इनव्हिझिबल मोड’मध्ये ठेवणे, भ्रमणध्वनी सतत अपडेट करत राहणे (त्यामुळे त्यातील कार्यक्रम तुम्हाला सतत समजतराहील), भ्रमणध्वनीला पासवर्ड ठेवल्यास दुसरा कोणीही तुमच्या भ्रमणध्वनीचा वापर करू शकणार नाही. कुठल्याही अनोळखी मेसेजमध्ये एखादी लिंक पाठवली गेली असेल, तर ती उघडू नका. मेलमधीलसुद्धा अनोळखी लिंक उघडू नका आणि एखाद्या ‘अँटीव्हायरस अॅप’चा वापर करण्याची सूचना प्रा. हांडगे यांनी केली आहे.

टिप्पण्या