Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

परळीत ना.पंकजाताई मुंडे यानी डाॅक्टरांचा केला सन्मान

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत आज जागतिक डाॅक्टर्स दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ना पंकजाताई मुंडे यांनी यानिमित्त शहरातील ज्येष्ठ डाॅक्टरांचा सत्कार केला. महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला नुकताच देश पातळीवर पुरस्कार मिळाला त्याबद्दल डाॅक्टरांनी ना. पंकजाताई मुंडे यांचा यावेळी गौरव केला. शहराच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. आरोग्याच्या संदर्भात असलेले या भागातील प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हयातील रस्त्याची कामे दर्जेदार होत असून सुमारे चोवीसशे कोटीचे रस्ते आगामी काळात पूर्ण होणार आहेत. असेही त्यांनी सांगितले. दहावी परिक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या डाॅक्टरांच्या पाल्यांचा ना.पंकजाताई यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला