Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

अकोला...पाटील हे वागणं बरं नव्ह....?

अकोला - राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांचे वडिल माजी आमदार व्ही. एन. पाटील यांनी घुंगशी येथील भाऊसाहेब देशमुख विद्यालयात जाऊन कुठलाही अधिकार नसताना तपासणीचा प्रयत्न केला तसेच तेथील कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली. यासंबंधीची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने डॉ. रणजित पाटील यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यात भाजपची सत्ता आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून गृह, नगरविकास, कौशल्य विकास यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी डॉ. रणजित पाटील यांच्याकडे दिली आहे. रणजित पाटलांचे मूळ गाव असलेल्या घुंगशी येथील विद्यालयाचे प्रकरणही काही वर्षांपासून गाजत आहे. या गावात व्ही. एन. पाटील आणि विज्युक्टा संघटनेचे पदाधिकारी असलेले प्रा. संजय देशमुख या दोघांचेही वेगवेगळे विद्यालय आहे. मात्र, शाळेतील पटसंख्या कमी होण्यावरून दोन्ही संस्थांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांचे वडिल माजी आमदार व्ही. एन. पाटील यांनी काल संजय देशमुख यांच्या भाऊसाहेब देशमुख विद्यालयात जाऊन तपासणी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत माध्यमिक शिक्षण विभागातील आत्माराम राठोड हे अधिकारी उपस्थित होते. व्ही. एन. पाटील विद्यालयाची तपासणी करत असताना शाळेचे प्राचार्य संजय आठवले मोबाईलमध्ये या साऱ्या प्रकरणाचे व्हिडीओ शुटींग घेत होते. त्यावर व्हिडीओ शुटींग कशाला घेता असे म्हणत पाटील यांनी प्राचार्य व कर्मचाऱ्यांशी वाद घातला. हा वाद एवढा वाढला की व्ही. एन. पाटील यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यावर तुम्ही अनधिकृतपणे विद्यालयाची तपासणी करत असून, कर्मचाऱ्याला मारहाण करत असून हा अधिकार तुम्हाला कुणी असे प्राचार्यांनी म्हटल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. यासंदर्भात व्ही. एन. पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.