Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

पोखरी येथे कृषीदुतांनी राबवला जनावरांच्या लसीकरणाचा उपक्रम

खंडाळा-(प्रतिनिधी)- तुषार पवार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय खंडाळा ता वैजापूर जि औरंगाबाद येथील सातव्या सत्रातील कृषी दूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत पोखरी  येथे राबविला जनावरांच्या लसीकरणाचा उपक्रम
या कार्यक्रम प्रसंगी कृषी महाविद्याल याचे ग्रामीण कृषी कार्यानुभव चे प्रमुख प्रा. सय्यद सर यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमास सरपंच दिलीप जाधव, उपसरपंच प्रभाकर ठुबे, पो.पा विठ्ठल ठुबे व ग्रामस्थ ज्ञानेश्वर ठुबे,किरण माळकर,बाळासाहेब ठुबे, दादासाहेब ठुबे,शिवाजी ठुबे,सुभाष ठुबे, रुस्तम ठुबे, बापु ठुबे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पशू वैद्यकीय डॉक्टर अजित राऊत यांनी लस देऊन जनावराना पावसाळ्यात होणारे विविध आजार व त्यांचा प्रतिबंध तसेच गूरांच्या पावसाळ्यातील खाद्यविषयी माहिती दुधाळ जनावरांची गाभण असताना घ्यावयाची काळजी विविध लसींचे नियोजन तसेच शेळी,मेंढी,कोंबडी यांच्यावर होणारे आजार व ते होऊ न देण्यासाठी त्यावरील काटेकोर नियोजन याविषयी मार्गदर्शन दिले
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषीदुत गणेश सपकाळ,नवनाथ सानप,सागर सोळुंके,सुजित शेळके,विशाल बोचरे,ज्ञानेश्वर पवार,महेश जाधव,अजय लोखंडे,पल्लवी विधाते,राधिका बोरसे यांचे मोलाचे योगदान होते