मुख्य सामग्रीवर वगळा

परतूर रेल्वे उड्डाणपूलाचे काम लवकरच होनार ना.लोनीकर

परतुर प्रतिनिधि / सुरेश कवडे - 

अंदाज पत्रके एक महिन्याच्या आत मंजूर होणार

नामदार बबनराव  लोणीकर यांचा यशस्वी पाठपुरावा

परतूर ते आष्टी राज्य महामार्गवर परतूर येथे मनमाड - सिकंदराबाद रेल्वे मार्गवर रेल्वे मार्गवर रेल्वे क्रॉसिंग आहे. सदरील रेल्वे मार्गवर रेल्वे वाहतूक जास्त प्रमाणात आहे. तसेच राज्यमार्गवर देखील खूप वर्दळीचा  आहे . त्यामुळे रेल्वे गेट बंद झाल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक बरयाच काळाकरिता ठप्प होऊन दोन्ही दिशेने गाड्याची रंग लागते, त्याचा परिसरातील सर्व व्यापारी , जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो व वेळेच्या अपव्यय होतो.
त्या मुळे परतूर आष्टी महामार्गवर रेल्वे क्रोसिंगच्या ठिकाणी उड्डाण पूल नामदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष पाठपुरावामुळे मंजूर झाला आहे.
सदरचा पुलाची मंजूर रक्कम ही 45 कोटी असून मागील रेल्वे अर्थसंकल्पात यास केंद्राने मान्यता दिली होती. उड्डाण पुलामुळे परतूर शहराच्या सौदर्यात वाढ होऊन वाहतूकीसाठी होणारी कोंडी कामयमची दूर होणार आहे. या अनुषंगाने पालकमंत्री  ना बबनराव लोणीकर यांनी नुकतीच परळी येथे  केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन चर्चा केली आणि सदरील काम तातडीने मार्गी लावण्याबाबत विनंती केली. त्यावर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी तात्काळ दक्षिण मध्य रेल्वेचे संबंधित अधिकारी श्री यादव याना परतूर येथील उड्डाण पुलाचे अंदाज पत्रके एक महिन्याच्या आत मंजूर करणेबाबत सूचना दिल्या. पालकमंत्री नामदार लोणीकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे उडाणपुलाचा प्रश्न लवकरच मार्गी  लागणार  आहे.

टिप्पण्या