या देशात विविध प्रकारचे कर रद्द होऊन सर्व समावेशक असा जीएसटी कर 1 जुलै पासून अमलात आलेला असून व्यापारी वर्गानी याची भीति मनात बाळगु नये असे आवाहन हिंगोली जिल्ह्याचे सहायक विक्रिकर आयुक्त निलेशजी शेवाळकर यानी रविवारी ता 2 रोजी जीएसटी चर्चासत्र प्रसंगी केले
शहरातील द्वारका फंक्शन हॉल मध्ये सकाळी 10 ते 12 या वेळेत स्थानिक कर सल्लागार गोविंद भंडारी आनी पुरूषोत्तम भंडारी यानी व्यापार्याच्या माहितिसाठी या चर्चासत्राचे आयोजन केले होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री शेवाळकर , परभनी येथील चार्टेड अकाउंटेंट श्यामजी धूत , उपस्थित होते ठोक व्यापार्याणि खरेदी विक्री च्या नोंद अध्यावत ठेवाव्यात तसेच 20 लाखाच्या आत उलाढाल असलेल्या व्यापार्याना जीएसटी मधून सूट देण्यात आली असल्याचे त्यानी सांगितले बिलाच्या नोंदि व भरावयाचे रिटर्न्स बाबत काळजी घ्यावी असे आवाहन धूत यानी केले या चर्चासत्रासाठी दोनशे च्यावर व्यापारी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरूषोत्तम भंडारी यानी केले सूत्रसंचालन ग्राहकमित्र संतोष छाजेड़ यानी तर आभार गोविंद भंडारी यानी मानले.
टिप्पण्या