Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

अहमदपूर येथील बौद्ध नगर स्मशानभूमीत वृक्षारोपन...!!

अहमदपूर प्रतिनिधी)
येथील बौध्द नगर स्मशानभूमीत आज सम्राट मित्रमंडळाच्या वतीने वृक्षारोपन करून आपली सामाजिक जबाबदारी जोपासली आहे.
मागील काही दिवसापूर्वी स्मशानभूमीतील काटेरी झूडपे,कचरा आदी हटवून स्मशानभूमीची स्वच्छता केली होती. तसेच सूशोभीकरणाचा एक भाग म्हणून वृक्षारोपनाचा संकल्प करण्यात आला होता. त्या नूसार आज प्रत्यक्ष वृक्षारोपन केले.तसेच वृक्षांसाठी संरक्षण म्हणून लोखंडी जाळीसूध्दा बसविण्यात आली.
येथे चिंच, पिंपळ,वड,करंजी आदी झाडांचे रोपण करण्यात आले. युवक नेते तथा कार्यक्रमाचे संयोजक डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी आणि अशोकराव सोनकांबळे यांनी ट्री गार्ड सौजन्य म्हणून दिले.
या सर्व उपक्रमामध्ये यूवक कार्यकर्ते परिसरातील छोटे विद्यार्थी आदींनी  श्रमदान करून वृक्षारोपन केले.
या उपक्रमात  सामाजिक कार्यकर्ते अशोकराव सोनकांबळे, जिवनराव गायकवाड, शिवाजीराव भालेराव,शरद बनसोडे, सिद्धार्थ गायकवाड, सिद्धार्थ बनसोडे,मिलिंद कदम,  आकाश सांगविकर,अय्याजभाई शेख, बाबूलाल,  दिलीप भालेराव, बालाजी मस्के,संदीप शिंदे, ईश्वर कांबळे, माणिक गूळवे,मच्छिंद्र सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.